१६३६ साली जेव्हा शहाजी महाराज आदिलशाहीत आले.. त्या दरम्यान दादोजी कोंडदेव कुलकर्णी आणि कान्होजी नाईक जेधे..हे भेटीस गेले..(संदर्भ शिवभारत) अथवा शहाजी महाराजांशी संधान साधले..
शहाजी महाराजांना आदिलशाही नवीन न्हवती.. त्यांनी त्या आधी देखील आदिलशाहीत १६२५ ते १६२८ मधील कालावधीत काम केले होते.. (त्या मूळे शहाजी महाराजांचे अनेक सरदारांशी चांगले असणे साहजिक आहे..) पुढे आम्ही तुमच्या कडे चांगली एकनिष्ठतेने नोकरी करू..असे कान्होजी नाईक जेधे आणि कृष्णाजी कुलकर्णीने सांगितले.. त्यावर.. शहाजी महाराजांनी ह्या दोहांना तहा नंतर आपल्या कडे मागून घेतले... (संदर्भ शिव भारत) (त्यात रणदुल्लाखान हा शहाजी महाराजांच्या जवळचा . कारण बराच कालावधी त्यांनी एकत्रित पणे मोघलांना लढाई दिली होती...त्या मूळे शहाजी महाराजांना रणदुल्लाखानाचा खूप मोठा पाठींबा होता..)
१६३६ च्या अखेरीस शहाजींनी दादाजीस आदिलशहा कडून मिळालेल्या नवीन सरंजामाच्या कारभारासाठी "मुनीम" व रणदुल्लाखानाने त्यास सरंजामी सुभ्याचा "सुभेदार" नेमले..
१६२९-३० च्या कालावधीत आदिलशहाचा मुरार जगदेव ह्याने पुणे लुटून जाळून "कसब्यावर गाढवाचा नांगर फिरवला" होता (त्या वेळेस शहाजी राजे. निजामशाही कडून होते.. व आदिलशाहने शहाजी राज्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मुरार जगदेवला पुण्यावर पाठवले होते.त्याच दरम्यान जाधव रावांचा खून झाला व शहाजींनी मोघलानकडे जाण्याचा निर्णय घेतला .) . तसेच मधल्या काल खंडात पुण्यात मोठा दुष्काळ पडला होता.. त्या मूळे शहाजी महाराजांनी दादोजीस तो सर्व भाग परत सिंचन्यास सांगितले...
त्या प्रमाणेच तूर्तास शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी खेड शिवापूरची स्थापना शहाजी महाराजांनी दादोजीला करायला लावली .आणि स्वतः कंपिलीला जाताच नवीन वाडे बांधायचे कार्य हाती घेतले....
चौल भागातील अस्थिरते मूळे शहाजींनी शिवाजी व जिजाऊ ह्यांना १६३६ नंतर वर्षभर खेड शिवापूरला ठेवले...खेड शिवापुरातील मुक्कामात शिवाजी व जिजाऊ ह्यांच्या सरक्षानार्थ रघुनाथ पंत कोर्डे वगैरे मंडळी होती..त्या वेळेस दादाजी कोंडदेव कुलकर्णी कोंढाण्यावर सुभेदार म्हणून राहत होते...; वर्षभरानी जेव्हा कंपिलीला वाडा बांधून पूर्ण झाला तेव्हा शहाजी महाराजांनी जिजाऊ व शिवराय ह्यांना तिकडे न्हेले...
पुढे शिवाजी महाराज व जिजाऊ पुण्यात कधी परत आले त्या बद्दल निरनिराळे समज आढळतात...काही बखरकार सांगतात , कि दादोजी कोंडदेव कुलकर्णी कर्नाटकात भरणा भरावयास गेले असतांना त्यांच्याबरोबर शहाजी महाराजांनी शिवाजी व जिजाऊ ह्यांना पुण्याला परत पाठवले.....परंतु.. दादाजी कोंडदेवांची महजर व पत्रे २६ जानेवारी १६३८ ते २८ सप्टेम्बर १६३९ पर्यंतची उपलब्ध झालेली आहेत. या वरून या अवकाशात दादाजी आपल्या सुभ्यावर मावळातच होते असे स्पष्ट होते. त्यानंतर २४ नोव्हेंबर १६३९ चे एक फर्मान आहे. त्यातील मजकुरावरून दादाजी मोहसब घेऊन इ.स. १६३९ च्या पावसाळ्या नंतर निघाले असावेत असे अनुमान काढणे भाग पडते. त्या नंतर दादाजीचा पत्र व्यवहार वगैरे इ.स. १६४० तील अद्यापि आढळलेला नाही. परंतु ते १६४० च्या पावसाळ्या नंतर मावळात आले असावेत. कारण पुन्हा इ.स. १६४१ च्या १४ जानेवारी पासून २१ मे १६४३ पर्यंतची त्यांची पत्रे उपलब्ध आहेत. यावरून शिवाजी आपल्या बाराव्या वर्षापर्यंत कर्नाटकात असल्याने दादाजी कोंडदेव बरोबर १६४० च्या अखेरी पर्यंत तरी खास आलेले नाहीत. तसेच शिवाजी राजा बरोबर मोठमोठे कारकून सेनापती व पाठविले होते त्या अर्थी दादाजी पंतांच्या सोबतीची जरूर न्हवती. अर्थात शिवाजी- जिजाई यांना दादाजी कोंडदेव बरोबर पाठविले हि केवळ काल्पनिक माहिती आहे. अर्थात ती चुकीची आहे.
शिवाजी महाराज पुण्यात त्यांच्या वयाच्या कोणत्या वर्षी आपल्या जहागिरीत आले त्याबद्दल बखरकार व इतर तत्कालीन चरित्रकार यांच्यात मतैक आहे. परंतु २-३ पत्रे प्रसिद्ध झालेली आहेत. त्यातील एक शिवचरित्र खंड ३ मध्ये आले आहे व दुसरे पत्र राजवाडे खंड १५ त आले आहे. त्यांच्या तारखा चुकीच्या वाचनामुळे पहिल्या पत्राची २ डिसेंबर १६३८ व दुसऱ्या पत्राची तारीख २४ डिसेंबर १६३९ अशा दिल्या आहेत. या तारखा खऱ्या मानल्या तर शिवाजीचे इ.स. १६३८ तच पुण्याकडे येणे झाले असे होईल. पहिले पत्र मूळ पत्राच्या नकलेवरून छापले आहे . नकल करणाराने " तिस खमैसन अलफ" ऐवजी "तिस सलासीन अलफ " असे चुकीचे वाचून आपल्या नकलेखाली आपल्या उपयोगाकरिता वरील चुकीच्या शक मासतिथी काढून नोंद करून ठेवली आहे. ज्या अर्थी हि नोंद "सुरु सूद " वगैरे शेऱ्याखाली केली आहे त्याअर्थी ती मूळ पत्रातील नाही आणि " शके १५६० सु|| तिस सलासीन अलफ बहुधान्य नाम संवत्सर १" अशी मिश्र तारीख देण्याची कोठेच पद्धत न्हवती. शिवाय हे पत्र प्रसिद्ध करणाऱ्या संपादकाचा शेराही त्या पत्राच्या त्याच संग्रहातील दुसऱ्या नकलेवर जादा नोंद नाही असा आहे. राजवाडेंनी त्यांच्या खंडात तर मूळ पत्राचा फोटो दिला आहे.. पण त्यातही पहिले तर सु|| सन देतांना " सु|| खामसैन अबीन अलफ" असा दिला आहे. खामसैन शब्द पाहता काही तरी "तिसा" सारखी अक्षरे दिसतात ती खोडून त्यावर खामसैन असे केले आहे. अजूनही बरेच विवेचन बेंद्रेंनी ह्या दोन पत्रांबद्दल दिले आहे. शेवटी त्यांनी ती दोन्ही पत्रे चुकीच्या तारखासहित असल्याचे सिद्ध केले आहे..पहिले पत्र ९ एप्रिल १६५९ चे आणि दुसरे पत्र हे १६४९ नंतरचे आहे..
तेच शिवाजी महाराजांची १६४३ नंतरची अस्सल पत्रे हि त्यांच्या शिक्क्यानिशी आहेत..ह्यावरून १६४२ ला शिवाजी व जिजाऊ पुणे प्रांती परत आलेत हे स्पष्ट होते.
......
सहा कलमी शकावलीत (आत्ता जो पुण्यात लाल महालामध्ये पुतळा आहे त्या देखाव्यासंबंधी असलेली काही माहिती आलेली आहे ती इथे देतो...)- " शके १५५७ युवा नाम संवत्सरी शहाजी राजे भोसले यासी बारा हजार फौजेची सरदारी इदलशाहीकडून झाली. सरंमजामास मुलुक दिल्हे त्यांत पुणे देश राजाकडे दिल्हा. राजांनी आपल्या तर्फेने दादाजी कोंडदेव मलठाणकर यांसी सुभा सांगून पुनियास ठाणे घातले. तेव्हा सोन्याचा नांगर पांढरीवर धरला. शांती केली. मग सुभेदार यांनी कसब्याची व गावगांनाची प्रांतात वस्ती केली. कौलाचे वर्ष दिल्हे. सहावे साली तनखा घेतला राजे विजापूर प्रांती गेले" - [संदर्भ - सहा कलमी शकावली ., शीचप्र. , पृ. ७१] (ह्या संदर्भ वरून...पुण्यावर जे काही सोन्याचा नांगर फिरवला गेला.. तो शहाजी राज्यांच्या आदेशाने फिरवला गेला हे स्पष्ट होते...तरीही काही लोकांनी तिथे खुद्द शहाजी राज्यांनाच अनुपस्थित केले आहे....)
१६३६ ते १६४२ ह्या काळात दादोजी कोंडदेव कुलकर्णी ह्यांच्या वर प्रामुख्याने जवाबदारी होती ती पुणे परिसरातील कारभार सुरळीत करण्याचा...त्यात सर्वात मोठा अडसर होता तो म्हणजे बांदलांची स्वैर वर्तणूक... बांदल, खोपडे जबरदस्तीने दाइते उकळत...आदिलशाही इस्लामी सरदारांनाही त्यांच्या या डोंगर दऱ्यांच्या भागात बंदोबस्त करणे जड होते. त्या मूळे दादाजीच्या कारस्थानांना आदिलशाहने पाठींबाच दिला...
परंतु दादाजीला एकट्याला हे सर्व जमेना.. बांदलावर दादाजी कोंडदेव चालून गेले असता कृष्णाजी बांदलाने दादाजी ला नामोहरण केले...स्वार पिटून काढले..दादोजीच्या घोड्याच्या दांड्या तोडिल्या..(शेपटी कापली) तिथून दादोजी नामोहरण होऊन शिवपुरी आले.. व कान्होजी नाईक जेधेंना भेटून त्यांची मदत घेतली.. व त्यांच्या मदतीने बांदलांचा बंदोबस्त केल्याचे संदर्भ मिळतात...
सिलींबकर देशमुख प्रकरण - १६३८ साली सिलींबकर देशमुख घराण्यात वारसा हक्का बद्दल मलिक अंबरच्या आधीपासून भांडणे व खुणाखुनी चालू होती. १६३८ ला दादाजी कोंडदेव यांनी सिलीमकरांच्या बाजूने न्याय निवडा केला होता.. परंतु दुसऱ्या एका करीन्यातील संदर्भानुसार..तसेच दादाजी कोंडदेव ह्यांचा निकाल शिवाजी महाराजांनी १६५७ ला फिरवला ह्या दोन्ही संदर्भावरून दादाजींनी चुकीचा न्याय निवडा केला होता असे आढळून येते...
फुलाजी नाईक व बाजी मौजे भिडगावने येथे उतरले. तो सिलीमकर पळून गेले. त्यावर फुलाजी नाईकांनी आपले वर्तमान दादाजी पंतांकडे विदित केले, सिलीमकरांनी माझ्या वडिलाच मारा करून माझे वतन घेतले आहे, ते मला परत मिळावे असे दादाजी पंतांकडे मागणी केली. दादाजी पंतांनी सिलीमकरांना बोलावून चौकशी केली. व शेवटी निम्मे निम्मे वतन वाटून खाणे असा उपाय सुचवला.. पण फुलोजी नाईकांनी ह्याला स्पष्ट नकार दिला. त्या वेळी दादाजी पंतांनी मध्यस्थी टाकून फुलोजीला वळवण्याचा प्रयत्न केला. पण फुलोजी माघार घेण्यास तयार झाला नाही. ह्या वेळेस सिलीमकरांनी दादाजी पंतांना गैरवाका समजावून लाच दिल्हा. त्यावरून दादाजींनी सिलीमकरांचे अगत्य धरून फुलोजीस न्हेऊन बासाचा मार देऊन जीवे मारिले - (अर्थात ह्या अन्याय कारक न्याय निवाड्याची पुष्टी १६५७ ला शिवाजी महाराजांनी केलेल्या न्याय निवाड्या नुसार दादाजींचा निवडा रद्द बातल ठरवून हबाजी व बालाजी नाईकांना ते वतन परत मिळवून दिले..)
अश्या तर्हेची भांडणे खोपडे, सिलीम्बकर, निळकंठराव यांच्याशी दादाजी कोंडदेव यांना कान्होजी नाईक जेधे यांना मदतीला घेऊन करावी लागली...बारा मावळच्या लावणी संचानिकारिता .. परंतु त्यात फारसे यश येऊन स्वास्थ्य व्हावे तेवढे झाले न्हवते...
दादाजी कोंडदेव १६३६ ते १६३९ च्या पावसाळ्या पर्यंत पुण्यात कोंढाण्यावर होते.. नंतर ते १६३९ च्या पावसाळ्या नंतर कर्नाटकात भरणा भरावयास गेले हे आपण आधी पाहिलेलेच आहे.. व ते १६४० च्या अखेरीस परत आले हे हि आधी बघितलेले आहे...
ह्या दरम्यान..शहाजी महाराजांचे आपल्याच भाऊ बंधकीत असलेल्या घोरपडे खानदानाशी वैर झाले... रण दुल्ला खान मेल्यावर.. त्याच्या पुत्राला डावलून जहागीर मिळवणारा अफझल खानाने.. बाजी घोरपड्याला हाताशी धरून कारस्थाने चालू केली होतीत त्याचे प्रयोजन घोरपडे आणि भोसले यांच्यात वैर आले... हे बघून शहाजीला भावी काळाची चून चून लागली व त्यांनी दादाजीला पुण्यात राहण्यासाठी वाडे, महाल, इत्यादी व्यवस्था करण्यास सांगितली...
१६४० ला परत आल्यावर दादाजी कोंडदेव याने शहाजी महाराजांनी सांगितल्या प्रमाणे पुण्यात रंग/ लाल महाल बांधला..
पुढे १६४२ वर्षाशी संबंधित घडामोडी व शिवाजी , जिजाऊ यांचे पुनरागमन व त्यानंतर च्या घडामोडी पुढील लेखनातून पाहुत...
संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
लेखक - वा.सी. बेंद्रे. १९७२
बऱ्याच ठिकाणी वा.सी. बेंद्रेंनी केलेली चिकित्सा जशी च्या तशी घेतलेली आहे.. तर काही ठिकाणी त्याचा सारांश घेतलेला आहे..तसेच लेखकाने स्वतःची काही मते..काही ठिकाणी कंसात टाकलेली आहेत..ह्याची नोंद घ्यावी..
No comments:
Post a Comment