शिवरायांचा जन्म
शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० सालचा शिवनेरी वरचा...वेगवेगळ्या बखरीन मध्ये, शकावलीत, प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात.. एक जुनी style ती म्हणजे १६२७ सालचा शिव जन्म मानणारी...
सभासद बखर - जन्म तारखेची नोंद नाही...
एक्याण्णव कलमी बखर - वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे कि १५४९ / १५५१ असे आहे ह्या बाबत सांशकता आहे..) क्षयणाम संवत्सरी
चिटणीस बखर - शके १५४९ प्रभाव नाम संवास्तरे वैशाख शुद्ध २ गुरुवार
मराठी साम्राज्याच्या छोटी बखर - १५४९ क्षयनाम संवास्तरे माहे वैशाख शुद्ध ५ चंद्रवासरी
शिवदिग्विजय - शके १५४९ प्रभाव संवत्सर वैशाख शुद्ध २ गुरुवासरे
शिवाजी प्रताप - तीस शके १५४९ रक्ताक्षी नाम संवास्तरे
शेडगावकर भोसले बखर - शके १५४९ प्रभावनाम संवत्सरे फसली सन १०३७ मिती वैशाख शुद्ध ३ रोजी शनवार
पंतप्रतिनिधी बखरीत - शके १५४९ शके प्रभाव नाम संवत्सर वैशाख शुद्ध १५ इंदुवारी
न्यायशास्त्री पंडितराव बखर - शालिवाहन शके १५४९ प्रभावनामे संवत्सरे
दुसरा प्रवाद - १६३० सालच्या जन्माचा आहे....
जेधे शकावली - शके १५५१ शुक्ल संवत्सर, फाल्गुन वद्या त्रितीय शुक्रवार (१९ फेब्रुवारी १६३०) नक्षत्र हस्त घाटी १८ पळे ३१ गड ५ पळे ये दिवसी
शिवापुरकर देशपांडे वहीतील शकावलीत - शके १५५१ शुक्ल नाम संवत्सरी फाल्गुन वद्या ३ शुक्रवार
forbes collection - जेधे शकावली सारखेच..
कवींद्र परामानंदांच्या अनुपुरणात - शालिवाहन शके १५५१ शुक्लानाम सवत्सरी उत्तरायणात शिशिर ऋतूमध्ये फाल्गुन वद्या तृतीयेला रात्री..
शिवराम ज्योतिषी यांनी केलेली शिवाजी महाराजांच्या कुंडली नुसार - संवत १६८६ (शके १५५१) फाल्गुन वद्या ३ शुक्र उ. घाटी ३०/९ राजा शिवाजी जन्म : र. १०/२३ ल. ४/२९.
अश्या प्रकारे वेगवेगळी मत मतांतरे आहेत... तर.. एकंदर सर्वांचा अभ्यास करतांना... इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे यांच्या मता नुसार.. निव्वळ जन्म तिथी बाबत काय उल्लेख आलेला आहे हे ग्राह्य न पकडता.. त्त्या संदभात इतर उल्लेखही तपासून त्याची ग्राह्यता आग्रह्यता तपासावी...
-- १६२७ सालचा जन्म बऱ्याच ठिकाणी देण्यात आलेला आहे.. मूळ चिटणीस बखरीतील जे वर्णन आलेले आहे त्या नंतरच्या बखरकारांनी कमी जास्त प्रमाणात तेच वर्णन उचलून धरलेले आढळते...
पण १६२७ सालचा जन्म गृहीत धरल्यास.. तो शिवनेरी वर झाला असेल का असा प्रश्न उभा ठाकतो.. कारण.. सर्वच बखरीत जिजाई ६-७ महिन्यांची गरोदर असतांना ती जाधवरावांच्या काही हालचालींमुळे शिवनेरीस येऊन राहिली असे लिहितात.
जाधवराव (जिजाऊनचे वडील ) इ.स. १६२१ मध्ये निजामशाही सोडून मोघलांकडे गेले..मध्ये १६२३ ला ते शहाजहानच्या बंडात सामील होऊन मलिक अंबर कडे काही दिवा खुर्रमचा हस्तक म्हणून होते.. पण तिथे खंडागळेचे प्रकरण उद्भवले त्यात जाधवरावांचा मोठा मुलगा मारला गेला व शहाजी राजेंचा सर्वात वडील चुलत भाऊ संभाजीही मारला गेला.. तेव्हा शहाजी चुलत भावाच्या मदतीस गेले जखमी होऊन पडले.. ह्या प्रकरणा मूळे जाधावारावांना परत खुर्रमच्या गोठ्यात परतावे लागले...त्यानंतर ते परत १६२९ ला आले....या दरम्यान भातवाडीच्या लढ्यात इ.स. १६२४-१६२५ या कालावधीत शहाजी महाराज आणि जाधवरावांचा आमना सामना झाला असावा अशीही शक्यता राहत नाही कारण जाधवराव त्या वेळेस युद्धात सामील न होता आपल्या जहागिरीत जाऊन बसले होते.. खुर्रम उत्तर हिंदुस्थानात जाताच जाधवराव परत मोगली चाकरीत शिरले.
आत्ता शहाजी राज्यान बद्दल माहिती घेऊयात १६२३ च्या खंडागळे प्रकरण मूळे जाधव आणि भोसले घराण्यात वित्तूष्टे आली होती.. हे मागे बघितले..पुढे शहाजी राजे भातवाडीच्या लढाई (१६२४-२५) नंतर भाऊ बंधकी मूळे निजामशाही सोडून इ.स. १६२५ अखेर आदिलाशाहाची "सरलश्करी" पत्करली. हि सरलश्करी शहाजी राजांनी १६२८ च्या पावसाळ्या पर्यंत केली ह्यास कागद पत्रांची पुष्टी मिळते...अर्थात अश्या काळात आदिलशहा कडे असतांना १६२७ लाच जिजाऊ ना शिवनेरी (निजामशाहीत ) वर ठेवणे अशक्य आहे..
पुढे बखरींच्याच वर्णना नुसार.. जिजाऊ व ३-४ वर्षाचा मुलगा संभाजी शहाजी महाराजांबरोबर विजापुरी गेल्याचे आढळते..मग १६२७ चाच जन्म गृहीत धरायचा झाल्यास तो विजापूरचा अथवा कर्नाटकातील धरायला लागतो..
परंतु जिजाऊना संभाजी राज्यांनंतर ४ मूले अल्पजीवी निपजली. यातील निदान २ तरी १६२५ - १६२८ च्या विजापुरी मुक्कामातील असली पाहिजेत या वरून जिजाऊ शहाजी महाराजान सोबतच विजापूरला गेल्या हे सिद्ध होते..व शिवाजीचा जन्म १६२८ च्या पावसाळ्या नंतरच ग्राह्य पकडावा लागतो...
तसेच निजामशाही डूबत आहे हे बघून शहाजी राज्यांनी अनेक मराठा सरदारांना एकत्रित करून बंडाळी उठवली..ती १६२९ ला.. म्हणजे १६२८ ला आदिलशाही सोडून ते निजामशाही कडे आले वा १६२९ ला बंड उठवले.. त्यात जाधवरावही सहभागी होते.. अर्थात १६२३ च्या खंडागळे प्रकारानंतर जाधवराव - शहाजी जिजाऊ यांचा जो काही संबंध आला असावा तो १६२९ या सालीच.. नंतर august मध्ये १६२९ लाच जाधवरावांना मारण्यात आले..म्हणजे त्या नंतर संबंध येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही... वा त्या आधी त्यांच्या भेटीची शक्यताच न्हवती म्हणून तो संबंध १६२९ या सालचाच असावा..पुढे जाधावरावांना धोक्याने मारल्या मूळे शहाजी राजांनी निजामशाही सोडण्याचे ठरवले.. वा त्यांनी आपल्या जहागिरीत जाऊन मोघालांशी संधान साधले.. ह्या दरम्यानच शिवनेरी वरील निजामी चाकरीत असलेला वैभवशाली विजयराज ह्याच्या मुलीशी (जयंती ) आपला मुलगा संभाजी ह्याचे विवाह लावून दिले... तो काळ १६२९ नोव्हेंबर चा पहिला पंधरवडा ... आणि लग्न लावून दिल्यावर.. शहाजी राजे दुसऱ्या पंधरवड्यात मोगलांची पंचहजारी सरंजाम वा संभाजीला हजारी घेतली...संभाजीच्या लग्नाच्या वेळेस जिजाऊ ६-७ महिन्याची गरोदर असावी असा तर्क निघतो...व त्या मूळे आपल्या समध्या कडे जिजाऊ ना संरक्षणास ठेवले हा तर्क जास्त संयुक्तिक आहे...
त्यामुळे जाधवराव पाठीमागे लागले म्हणून न्हवे तर जाधवरावांचा खून झाल्यामुळे निजामी मंत्र्याच्या सुडार्थ शहाजी महाराजांनी मोघलांना जाऊन मिळायचे ठरवले तेव्हा संभाजीचे लग्न लाऊन जिजाऊना शिवनेरी ठेवले...
जिजाऊनच्या भावाचा म्हेवणा ..आणि मुलगा संभाजी ह्याचा सासरा.विजय राजा .. असा दुहेरी संबंध जोडला गेल्याने.. जिजाऊनच्या संरक्षणाची संपूर्ण खात्री पटल्यावर शहाजी महाराज मोघलांना जाऊन मिळाले...
अश्या प्रकारे.. १६३० साली शिवनेरी वरच शिवरायांचा जन्म झाला असा निष्कर्ष काढता येतो....
आत्ता पुढून मागे तपासणी करायची झाल्यास...
बखरींच्या वर्णनानुसार..निजामशाही बुडाल्यावर शहाजी राजे आदिलशहा कडे बारा हजारी 'फर्जंद" वजीर म्हणून गेले व आपल्या मुलाला व पत्नीला त्यांनी बोलावले त्यावेळी शिवाजी ७ वर्षाचा होऊन गेला होता ...आदिलशहा सोबत हा करार शहाजी महाराजांनी १६३६ च्या उत्तरार्धात केला.. त्या वरून ७ वर्षे आधी म्हणजे १६२९- १६३० चा पूर्वार्ध ह्या दरम्यान शिवाजीचा जन्म असावा असा तर्क निघतो..\
पुढे.. परत इ.स. १६४२ ला आदिलशाहीत आपलं धर सुटत आहे हे बघून शहाजी राजांनी शिवाजी व जिजाई ला १६४२ साली पावसाळ्या नंतर पुण्यात रवाना केले..त्या वेळेस शिवाजीचे वय वर्षे १२ होते..परत एकदा ह्यानुसार १६३० चाच तर्क निघतो...
बखरीन नुसार.. दादाजी कोंडदेव वारले तेव्हा शिवाजी १७ वर्षाचे होते..दादोजींचा मृत्यू काल १६४७ मार्च नंतर जुलै पूर्वीचा दिलेला आहे.. ह्या वरून परत एकदा जन्म साल १६३० बरोबर ठरते.
अश्या अनेक गोष्टींची पडताळणी करून वा.सी. बेन्द्रेंनी शिव जन्म तारीख १९ फेब्रुवारी १६३० अशी ठरवलेली आहे...

संदर्भ ग्रंथ - श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)
लेखक - वा.सी. बेंद्रे. १९७२ प्रकरण दुसरे - शिवाजी महाराजांचा जन्म आणि बालपण..पान क्रमांक १७-३७

No comments:
Post a Comment